Ratnagiri : महाराष्ट्रात हायड्रोजन पॉलिसी तयार करण्याचा निर्णय : उदय सामंत

0
148
Ratnagiri

Indiagroundreport वार्ताहर
रत्नागिरी :
(Ratnagiri)महाराष्ट्रात हायड्रोजन पॉलिसी(hydrogen policy) तयार करण्याचा निर्णय झाला असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. अमेरिकेच्या शिष्टमंडळाबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे उद्योग मंत्र्यांनी सांगितले.

ही पॉलिसी राबविल्यास हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, स्कूटर्स(scooters) एवढेच नव्हे तर सागरी मार्गावरील बोटीही तयार होतील. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. येत्या ८ – १५ दिवसांत ही हायड्रोजन पॉलिसी तयार करण्यात येणार आहे. यासाठी एक टीम थोड्याच दिवसांत रत्नागिरीत येणार आहे, असे उदय सामंत(Uday Samant) यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नॅशनल हायड्रोजन मिशन चालविण्याचा निर्णय घेतला असून, त्याला महाराष्ट्र शासनाने पहिल्यांदाच प्रतिसाद दिला आहे. इलेक्ट्रिकल वाहनांप्रमाणेच आता हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्या, स्कूटर्स तयार होतील. यासाठी अमेरिकेशी(America) चर्चा करून करार केला जाणार आहे.

जपानमधील सुमिटोमो(Sumitomo) या कंपनीचे मुंबईत लवकरच कार्यालय उभारण्यात येणार आहे. कार्यालय बांधल्यानंतर या कंपनीच्या माध्यमातून परदेशातील मोठमोठे उद्योग महाराष्ट्रात येण्यास सुरुवात होईल. याचा रत्नागिरी जिल्ह्यालाही मोठा फायदा होईल, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.