spot_img
HomeInternational-mrNew York : ऑस्कर नामांकित लेखक, दिग्दर्शक तथा अभिनेते डग्लस मॅकग्रा यांचे...

New York : ऑस्कर नामांकित लेखक, दिग्दर्शक तथा अभिनेते डग्लस मॅकग्रा यांचे निधन

New York: Oscar-nominated writer, director and actor Douglas McGrath passed away

Indiagroundreport वार्ताहर
न्यूयॉर्क : (New York)
ऑस्कर नामांकित लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते डग्लस मॅकग्रा(६४) यांचे निधन झाले आहे. ‘एवरीथिंग इज फाइन'(Everything is Fine) या त्यांच्या निर्मिती संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. संस्थेच्यावतीने आयोजित न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डग्लस मॅकग्रा यांच्या पश्चात पत्नी जेन रीड मार्टिन आणि मुलगा हेन्री मॅकग्रा आहे. त्यांच्या निधनाने अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे.

डग्लस मॅकग्रा(Douglas McGrath) यांनी नाटकांसह हॉलिवूडमध्ये देखील काम केले आहे. डग्लस मॅकग्रा हे अमेरिकन पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते होते. त्यांनी अनेक मानाचे पुरस्कार पटकाविले आहेत. तसेच एमी पुरस्कारासाठी नामांकनांसह विविध पुरस्कार देखील डग्लस मॅकग्रा यांनी आपल्या नावे केले आहेत.

डग्लस मॅकग्रा यांना ‘ब्युटीफुल : द कॅरोल किंग म्युझिकल’ या पुस्तकासाठी(book) ‘टोनी पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. तसेच ‘बुलेट्स ओव्हर ब्रॉडवे’ या पटकथेसाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. डग्लस मॅकग्रा यांनी ‘एम्मा’, ‘निकोलस निकेलबी’, ‘कंपनी मॅन’, ‘इनफेमस’ अशा अनेक सिनेमांच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तसेच एमी नॉमिनेटेड ‘हिस वे’ आणि ‘बिकमिंग माइक निकोल्स’ या माहितीपटाचे दिग्दर्शन केेले आहे.

अनेक दर्जेदार सिनेमांच्या लेखन, दिग्दर्शनाची धुरा सांभाळण्यासोबत त्यांनी चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. त्यांच्या सिनेमांची चाहते(fans) आतुरतेने वाट पाहत असायचे.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर