spot_img

Mumbai : श्रद्धा वालकरच्या पत्राची महाराष्ट्र पोलिसांनी दखल का घेतली नाही? : आशिष शेलार

आशिष शेलार यांनी केली चौकशीची मागणी

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : आफताबच्या जाचाला कंटाळून श्रद्धाने पोलिसात तक्रार केल्याची माहिती आता समोर येत आहे. ब्लॅकमेलिंग आणि प्राणघातक हल्ला करण्याची भीती तिने आफताबविरुद्ध पत्राद्वारे महाराष्ट्र पोलिसांत केली होती, अशी माहिती उघड झाली आहे. याच मुद्यावरुन भाजप नेते आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलीस(the police) या विषयावर थंड का बसले?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

आशिष शेलार(Ashish Shelar) यांनी म्हटले की, नराधम आफताबने श्रद्धा वालकरचे तुकडे केले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. आमच्या महाराष्ट्रातील एक भगिनीचा खून आफताबने अतिशय क्रूरपद्धतीने केला. त्या सर्वांची चौकशी सुरु असताना आता माध्यमांसमोर एक पत्र आले आहे. त्या पत्रानुसार, २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धा वालकरने तिच्या जीवाला धोका असून, तिचा खून करण्याचा प्रयत्न नराधम आफताब करणार आहे, अशी माहिती तिने महाराष्ट्र पोलिसांना दिली होती. या पत्राची रिसिव्हड कॉपी(received copy) देखील माध्यमांवर दिसत आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन सरकार आणि पोलीस या विषयावर थंड का बसले? जर आमच्या मराठी भगिनीने तिच्यावर होणाऱ्या हल्ल्याची संपूर्ण माहिती दिल्यावर सुद्धा महाराष्ट्रातील पोलीस या पत्रावर का कारवाई करीत नव्हती? श्रद्धाचे आडनाव वालकर होते म्हणून की, तो आफताब होता म्हणून? सरकारमध्ये बसणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना समर्थन राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे होते म्हणून? की, या सर्व प्रकारावर पांघरून घालायचे होते? या सगळ्याची चौकशी होणे ही काळाची गरज आहे.

तत्कालीन पोलीस आणि सरकारने कडक कारवाई केली असती, तर श्रद्धा आज वाचली असती. माझी पोलिसांना विनंती(request) आहे की, हे पत्र दाबण्यात आले का?, याची चौकशी दडपण्यात आली का?, आफताबवर कारवाई होऊ नये याबाबत कुणाचे दडपण होते का? या सर्वांची चौकशी होणे गरजेचे आहे, अशी मागणीही आशिष शेलार यांनी केली आहे.

Explore our articles