
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी मराठी मनोरंजनसृष्टीवर भाष्य केले. तसेच ‘आपल्या देशात कलाकारांची कुठे नाव देतात का? फक्त चौकाला देतात’, अशा शब्दात खंत व्यक्त केली. रंगभूमीवरचे सुपरस्टार प्रशांत दामले यांनी ‘एका लग्नाची पुढील गोष्ट’ या नाटकाचा १२५०० प्रयोग साकारल्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या ऐतिहासिक प्रयोगानंतर मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी लावली.
अभिनेते प्रशांत दामले(Prashant Damle) यांच्या ‘एका लग्नाची पुढील गोष्ट’ या नाटकाच्या १२५०० प्रयोगानिमित्त त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हजेरी दर्शविली. यावेळी राज ठाकरे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
राज ठाकरे म्हणाले की, आज प्रशांत दामले 12 हजार 501वा प्रयोग करतात आणि तोही क्षणमुखानंदमध्ये करतात ही सोपी गोष्ट नाही. मराठी माणूस हा नाटकवेडा आहे. मराठी महिला सिनेमासाठी नटून-थटून जात नाहीत, त्या नाटकाला जातात.
आज मोठ्या कलाकाराचे सत्कार करायला मोठी लोक उरलेली नाहीत, म्हणून आम्हाला बोलाविले जात. मुख्यमंत्री(Chief Minister) येऊन गेले. उपमुख्यमंत्री, आमचे दोन-तीन कार्यक्रम झाले.
यावेळी राज ठाकरे यांनी कलाकराच्या मानसन्मानाविषयी देखील भाष्य केले. आपल्या देशात कलाकरांची कुठे नाव देतात का? फक्त चौकाला’, असा सवाल उपस्थित करीत राज ठाकरेंनी कलाकारांच्या मानसन्मानाविषयी खंत निर्माण केली.


