Mumbai : उद्धव ठाकरे यांच्या संपत्तीच्या चौकशीबाबतची याचिका फेटाळली न्यायालयाने

0
146
Mumbai

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई
: (Mumbai) शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्या संपत्तीच्या चौकशीबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी आज पार पडली. उद्धव ठाकरे आणि कुटुंबाने बेहिशोबी मालमत्ता जमवली असल्याचा आरोप करीत गौरी भिडे(Gauri Bhide) यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ही याचिका दाखल केली होती.

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी एवढी मालमत्ता जमवली आहे, त्यांच्या उत्पन्नाचा नेमका स्त्रोत काय आहे?, याची चौकशी व्हावी, त्यांच्याकडे असलेली संपत्ती कुठून आली याची माहिती सर्वांना मिळायला हवी, असा आरोप गौरी भिडे यांनी केला होता.

प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या सामना वृत्तपत्राचा कोरोना काळातील(Corona period) टर्नओव्हर 42 कोटी रुपये होता. या काळात सर्व वृत्तपत्र तोट्यात असताना सामना नफ्यामध्ये होता. या सर्वांची चौकशी व्हावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी हायकोर्टात केली होती.

निवडणूक आयोगाला(Election Commission) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, उद्धव ठाकरेंची एकूण संपत्ती जवळपास 125 कोटींची आहे. यामध्ये 22 कोटींची शेअर्समधील गुंतवणूक आहे. 1 कोटी 61 लाखांची एफडी, मातोश्री आणि मातोश्रीसमोरील दोन घरं यांची किंमत 52 कोटी आहे, तसेच कर्जतमध्ये एक फार्महाऊस आहे.

रश्मी ठाकरे यांची 35 लाखांची एफडी आहे, तर शेअर्स आणि बॉण्डमध्ये 34 कोटींची गुंतवणूक आहे. 6 कोटी किमतीची जमीन त्यांच्या नावे आहे, तर आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीत एफडीमध्ये 10 कोटींची गुंतवणूक आहे. शेअर्स आणि बॉण्डमध्ये 20 लाखांची गुंतवणूक आहे. गाळे, जमीन अशी जवळपास 5 कोटींची संपत्ती त्यांच्या नावे आहे.