Mumbai : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी विरोधात मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे जोरदार आंदोलन

0
156

प्रशांत बारसिंग
मुंबई : ‘अरे, शिवरायांचा इतिहास आठवा, भगतसिंग कोश्यारीचं पार्सल घरी पाठवा’, ‘काळ्या टोपीचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, ‘राज्यपाल हाय हाय’ अशा गगनभेदी घोषणा देत मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी सीएसएमटी(CSMT) येथे जोरदार आंदोलन केले.

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून, आज मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे(Narendra Rane) यांच्या नेतृत्वाखाली भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, युवती अध्यक्षा अदिती नलावडे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, उपाध्यक्ष बाप्पा सावंत, उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष अर्शद आमीन, मुंबादेवी तालुकाध्यक्ष प्रवीण ठाकूर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अयूब मेमन, ग्राहकसेलचे जिल्हाध्यक्ष विजय देसाई, विद्यार्थी राष्ट्रीय सचिव मनोज टपाल, दक्षिण मध्यच्या महिला जिल्हाध्यक्षा समृद्धी जंगम, पूजा पवार, विद्यार्थी अध्यक्ष प्रशांत दिवटे आदींसह युवक, विद्यार्थी व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या आंदोलनासह राज्यातील तालुका, जिल्हा ठिकाणी राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. हिंगोली(Hingoli) येथे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पुण्यात शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.