
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai) समुद्रमार्गाने होणाऱ्या संशयित हालचाली आणि समुद्रकिनारी भागातील परिसरात वावरणाऱ्या संशयित व्यक्ती याबाबतची तपासणी करण्यासाठी मुंबई पोलीस आणि सागरी पोलीस, तसेच मिरा-भायंदर पोलिसांच्या वतीने तपासणी मोहीम(campaign) राबविण्यात येत आहे.
ही मोहीम विशेष करून आज आणि उद्यापर्यंत राबविण्यात येत आहे. यासाठी मुंबईतील(Mumbai) सागरी पोलीस ठाण्यातील अनेक पोलीस तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रामध्ये भारतीय नौदल सेना यांच्या वतीने सागरी सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. त्यात फिशरीज, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड(एमएमबी), कस्टम, कोस्टगार्ड आदी विभागांशी समन्वय राखून सागरी सुरक्षा अनुषंगाने अभियान राबविण्यात येत आहे. तर, मिरा-भाईंदर आयुक्तालयातील सुमारे १६० पोलीस अधिकारी आणि ४९० पोलीस अंमलदार यांच्यासह महाराष्ट्र सुरक्षा बल आणि होमगार्डचे(Home Guard) १७० जवान, सागरी बोट, चारचाकी वाहने व मोटार सायकलद्वारे तपासणी आणि नाकाबंदी करण्यात येत आहे.


