Mumbai : मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेबाबत हायकोर्टात याचिका

0
235

सुधाकर कश्यप
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेबाबत मुंबई हायकोर्टात आवाहन याचिका(petition) दाखल करण्यात आली आहे. ही याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक राजू पेडणेकर यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर आता 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या(Mumbai Municipal Corporation) सभागृहाची मुदत फेब्रुवारी 2022 मध्ये संपली आहे. तेव्हापासून महानगरपालिकेवर प्रशासक आहे. पालिका आयुक्त इकबाल चहल(Iqbal Chahal) हे प्रशासक म्हणून काम पहात आहेत. पालिका सभागृह बरखास्त होण्यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्डची पुनर्रचना करण्यात आली. पूर्वी 227 वार्ड होते, मात्र सभागृह बरखास्त करण्यापूर्वी वॉर्डची पुनर्रचना करण्यात आली. 9 वार्ड वाढवून ते 236 करण्यात आलेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात वाढविण्यात आलेल्या वॉर्डाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रद्द करून पुन्हा 226 वार्ड केलेत. तसा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. शिंदे सरकारने(Shinde government) घेतलेल्या याच निर्णयाला आता मुंबई हायकोर्टात आवाहन देण्यात आले आहे. याची दखल घेऊन आज न्यायमूर्तींनी संबंधित पक्षकारांना त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिलेत. याबाबत संबंधित पक्षकारांना 30 नोव्हेंबरपर्यंत आपले म्हणणे मांडायचे आहे. या आवाहन याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे.