Mumbai : ‘त्या’ परीक्षा टीसीएस, आयबीपीएस कंपन्यांकडून घेण्यास मान्यता

0
195

प्रशांत बारसिंग
मुंबई : राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस(TCS-ION and IBPS) या कंपन्यांकडून घेण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे भरतीप्रक्रिया सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ‘ब’, गट ‘क’ आणि गट ‘ड’ ही पदे सरळ सेवेने भरताना आता या कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा(competitive examination) ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येतील.

यासाठी परीक्षा घेण्याचे दर, परीक्षांची विहित कार्यपद्धती व इतर अटी-शर्ती माहिती तंत्रज्ञान विभागाच्या उच्चाधिकार समितीच्या मान्यतेने करण्यास देखील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. या अनुषंगाने उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा होऊन आज या दोन्ही कंपन्यांनी दिलेल्या कराराच्या प्रारुपास मान्यता देण्यात आली(approved).

संबंधित विभागाने पदभरती करताना ऑनलाईन(online) पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रिया व स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी या कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करावयाचा आहे. या संदर्भातील विस्तृत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येत आहे.