spot_img

Mumbai : सुषमा अंधारे यांच्या विरोधात अनुद्गगार

Mumbai: Anudgagar against Sushma Andhare

गुलाबराव पाटील यांच्या विरोधात घाटकोपरमध्ये आंदोलन
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांच्या विरोधात अनुद्गगार काढल्याच्या आरोपावरून आज घाटकोपर पूर्वेकडील निलयोग मॉलजवळ ईशान्य मुंबई शिवसेनेच्यावतीने(उद्धव बाळासाहेब ठाकरे) तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी गुलाबराव पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यांच्यावर पोलीस कारवाई व्हावी, अशीही मागणी यावेळी करीत असा प्रयत्न पुन्हा झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही यावेळी शिवसैनिकांनी दिला.

सरकारमधील एक जबाबदार मंत्री गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) यांनी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत अपशब्द वापरून समस्त महिला वर्गाचाच अपमान केला आहे, अशा प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या. तर, बेताल वक्तव्य करून केलेल्या अपमानाचा निषेध म्हणून शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्र.-८ च्यावतीने विभागप्रमुख तुकाराम(सुरेश) पाटील आणि विभाग संघटिका भारती बावदाने यांच्या नेतृत्वाखाली निलयोग मॉल, घाटकोपर(पूर्व) येथे जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी उपविभाग प्रमुख प्रकाश वाणी यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.

Pratapgarh : तालाब में डूबकर तीन भाई-बहनों की मौतपास के तालाब में नहाने गए थे तीनों बच्चे

प्रतापगढ़ : (Pratapgarh) उत्तर प्रदेश के प्रतापगढ़ जिले (Pratapgarh district of Uttar Pradesh) में सोमवार दोपहर एक हृदयविदारक हादसे में तीन सगे भाई-बहनों की...

Explore our articles