spot_img

Mumbai : 2 वर्षीय चिमुरडीस टेम्पोने चिरडले

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : मुंबईत एका दोन वर्षीय चिमुरडीचा अपघाती(Accident) मृत्यू झाला आहे. ही मुलगी आपल्या भावासोबत खेळत होती. यावेळी एका टेम्पोने या मुलीला चिरडले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुःखद घटना काल, शनिवारी दुपारी घडली. मुंबईतील(Mumbai) चित्ता कॅम्पमध्ये ही हृदय हेलवणारी घटना घडली आहे. ही चिमुरडी आपल्या भावासोबत खेळत असताना जागेवर उभा असलेला टेम्पो अचानक सुरू झाला. तेव्हा मुलगी आपल्या भावासोबत खेळत असताना टेम्पोसमोर आली. टेम्पोवाल्याने पुढे न पाहता टेम्पो सुरू केला आणि मुलीला धडक दिली.

हा टेम्पो २ वर्षांच्या चिमुरडीच्या अंगावरून गेला, त्यानंतर मुलीला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना सीसीटीव्हीमध्ये(CCTV) कैद झाली आहे. याप्रकरणी पोलीस कलम 304(अ) व इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

Explore our articles