
मुकुंद लांडगे
मुंबई : दरवर्षी २१ नोव्हेंबर हा ‘हुतात्मा दिन’ पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर आज बंधुत्व फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने हुतात्मा चौकात(Hutatma Chowk) संयुक्त महाराष्ट्रच्या चळवळीतील १०७ हुतात्मांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी विविध स्तरातील मान्यवर आणि कामगार संघटनांचे नेते सहभागी झाले होते.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी सुधाकर अपराज, दत्ता खेसे, मारुती विश्वासराव, विजय रणदिवे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या पदाधिकारी कल्पना देसाई, कार्यकर्ते सुदेश पवार, बंधुत्व फाऊंडेशनचे अध्यक्ष समीर राणे, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे चिटणीस किरण फडणीस, पदाधिकारी विजय काशिलकर, संजय तावडे, पोर्ट ट्रस्टमधील सामाजिक कार्यकर्ते शशी नाईक, सुधीर मुंज, मधू कोळी, हरिश्चंद्र सावंत, अनिल चव्हाण, बंड्या तावडे इत्यादी उपस्थित होते.
दरम्यान, बंधुत्व फाउंडेशनचे हे सामाजिक कार्य २००३ सालापासून आजतागायत सातत्याने चालू आहे, अशी माहिती देण्यात आली.