
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : ज्यांनी सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली, त्यांनी आम्हाला शिकवू नये. आम्ही जे दिवसरात्र काम करीत आहोत, हे पाहून यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असा टोला एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना लगावला.
राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.
सीमावर्ती भागातील प्रश्नाबाबत बोलतांना त्यांनी म्हटले की, कर्नाटकचा विषय हा २०१२ चा आहे. इतक्या वर्षांत तुम्ही या सीमाप्रश्नी काय निर्णय घेतला? आम्हाला शिकवायचा तुम्हाला अधिकार नाही. हा एकनाथ शिंदे स्वत: ४० दिवस तुरुंगात गेला.
आम्ही सीमावर्ती भागातील नागरिकांना न्याय देण्यासाठी काम करीत आहोत. सीमावर्ती भागातील आमच्या बांधवांसाठी आम्ही योजना केल्या आहेत. महाराष्ट्राचा(Maharashtra) एकही तुकडा कुठेही जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) यांची तुलना कुणाशी होऊ शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाच नाही, तो कुणीही सहन करणार नाही. पण, सत्तेच्या खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले ते आमच्यावर टीका करतात. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आम्ही चालत आहोत. आत्मविश्वास होता म्हणून तर 50 आमदार आणि 13 खासदार माझ्यासोबत होते. हात दाखवायचा विषय म्हणाल तर आम्ही ज्यांना हात दाखवायचा आहे त्यांना 30 जूनला दाखविला आहे.