spot_img
HomeUncategorizedMumbai : मानधन वाढीबाबत सरकार गंभीर असून लवकरच ती करणार जाहीर :...

Mumbai : मानधन वाढीबाबत सरकार गंभीर असून लवकरच ती करणार जाहीर : महिला व बालविकास मंत्री

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर जोरदार आंदोलन

दीपक पवार
मुंबई : मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठी भाषेत उपलब्ध करून देणे, अंगणवाडीचे भाडे, आहार व इंधनभत्ता, प्रवासभत्ता अशा २२ मागण्या घेऊन महाराष्ट्रातील गावागावातून हजारो अंगणवाडी कर्मचारी(Anganwadi workers) महिलांनी मंत्रालयासमोर येऊन आपली ताकत दखावली. सरकारने याची दाखल घेत मानधन वाढीबाबत सरकार गंभीर असून, लवकरच ती जाहीर करण्याची ग्वाही दिली.

महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा(Mangal Prabhat Lodha) यांनी शिष्टमंडळाला आमंत्रित केले व सविस्तर चर्चा केली. शिष्टमंडळात एम. ए. पाटील, शुभा शमीम, भगवानराव देशमुख, निशा शिवुरकर, माधुरी क्षीरसागर, जीवन सुरुडे, सरिता कंदले यांचा समावेश होता. मंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली व आझाद मैदानावर स्वत: येऊन मानधन वाढीबाबत सरकार गंभीर असून, लवकरच ती जाहीर करण्याची ग्वाही दिली.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मंगळवारीच आझाद मैदानावर निदर्शने केली. मानधनवाढ, पोषण ट्रॅकर मराठी भाषेत उपलब्ध करून देणे, अंगणवाडीचे भाडे, आहार व इंधनभत्ता, प्रवासभत्ता, सेवा समाप्ती लाभ आदी कर्मचाऱ्यांच्या थकीत रकमा देणे, खाजगीकरण रोखणे, ग्रॅच्युइटी लागू करण्याबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन एम. ए. पाटील, शुभा शमीम, कमल परुळेकर, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली झाले.

संपावर जाण्याची तयारी

कृती समितीने या सर्व आश्वासनांची पूर्तता करण्याकरिता शासनाला एक महिन्याची मुदत दिली आहे. तोपर्यंत मानधन वाढीचा आदेश न निघाल्यास नागपूर(Nagpur) येथील हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मोर्चा काढण्याचा व अधिवेशनात सर्व प्रश्नांवर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय न झाल्यास सरकारला संपाची नोटीस देऊन संपावर जाण्याची तयारी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर