Jalna : राजेश टोपेंमुळे कोरोना काळात तीन लाख लोकांचा मृत्यू : बबनराव लोणीकर

0
186

Indiagroundreport वार्ताहर
जालना : राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे(Rajesh Tope) यांच्यामुळे कोरोना महामारीच्या काळात महाराष्ट्रात तीन लाख लोकांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर(Babanrao Lonikar) यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने एकही लस विकत घेतली नाही. ग्लोबल टेंडरच्या नावाखाली केवळ फसवणूक करण्यात आली, असा देखील आरोप बबनराव लोणीकर यांनी केला आहे.

जालना जिल्ह्यातल्या परतूरमध्ये केलेल्या भाषणात लोणीकर यांनी हा आरोप केला. ग्लोबल टेंडरच्या(global tender) नावाखाली आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केली आणि एकही लस विकत घेतली नाही. त्यामुळे ‘लबाड लांडगं ढोंग करतंय लस आणण्याचं सोंग करतंय’, असे म्हणत बबनराव लोणीकर यांनी राजेश टोपे आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार(Mahavikas Aghadi government) यांच्यावर टीका केली आहे.