NAVI MUMBAI : नाताळच्या पार्श्वभूमीवर गीतनृत्यात्मक ‘फ्लॅश मॉब’व्दारे स्वच्छता संदेशाचे प्रसारण

0
457

नवी मुंबई : ख्रिसमस अर्थात नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर नवीन वस्तू खरेदीचा बाजारपेठांतील उत्साही माहौल लक्षात घेऊन या गर्दीमध्ये स्वच्छता संदेशाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षाच्या वतीने वाशी येथील इनॉर्बिट मॉल आणि सीवूड नेरूळ येथील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये ‘फ्लॅश मॉब’ ही अभिनव संकल्पना उत्साहाने राबविण्यात आली. या दोन्ही ठिकाणी मोठ्या संख्येने कुटुंबासह उपस्थित असलेल्या नागरिकांनी फ्लॅश मॉबमधील गीतनृत्यांना उत्तम प्रतिसाद देत यातील शंबरहून अधिक कालाकलाकारांसह ‘निश्चय केला, नंबर पहिला’ चा गजर केला. यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत अभियानाचे नमुंमपा नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब राजळे यांनी उपस्थित नागरिकांना कचरा वर्गीकरण व त्याच्या सुयोग्य विल्हेवाट पद्धतीचे तसेच प्लास्टिक पिशव्यांना ठाम नकार देत कापडी पिशव्यांचा वापर वाढविण्याविषयीचे आवाहन केले.

        यावर्षी ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’ ला सामोरे जात असताना गतवर्षीचे देशातील तृतीय क्रमांकाचे मानांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने जोरदार प्रयत्न सुरू केले असून आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार व्यापक लोकसहभाग घेत विविध उपक्रम राबविण्यावर भर दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून फ्लॅश मॉबची संकल्पना राबविण्यात आली, ज्यामधील गीतनृत्यांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कौतुकाची दाद दिली.

        सर्वसाधारणपणे सणाच्या वातावरणमॉलमधील वातावरण खरेदीच्या उत्साहाचे असताना अचानक सगळीकडून वाद्ये वाजू लागतात आणि लोकांना काही कळण्याच्या आत चोहोदिशांनी शेकडो युवक – युवती मॉलच्या मधल्या मोठ्या जागेत एकत्र येतात आणि लोकप्रिय गाण्यांवर नाचू लागतात. हे अचानक काय झाले हे बघण्यासाठी सगळे त्यांच्या आसपास दुतर्फा जमतात आणि उत्सुकतेने बघू लागता. त्यातील काही गाण्यांतून स्वच्छता संदेशाचे प्रसारण होते आणि नागरिकांच्या मनावर कचरा वर्गीकरणाचा तसेच स्वच्छतेचा संदेश बिंबविण्यासाठी फ्लॅश मॉबची अनोखी संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेने राबविली असल्याचे लोकांना कळते. मग लोकही स्वच्छतेविषयी जनजागृतीच्या या फ्लॅश मॉब उपक्रमात स्वयंस्फुर्तीने सहभागी होतात आणि स्वच्छतेचा एकच जागर केला जातो..     

वाशीमधील इनॉर्बिट मॉलमध्ये सायं. 6 वा. व सीवूड मधील ग्रँड सेंट्रल मॉलमध्ये रात्री 7 वा. कोणतीही पूर्वकल्पना नसताना अचानक घडविलेल्या फ्लॅश मॉब या अभिनव उपक्रमामुळे स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत अनोख्या पध्दतीने पोहचविण्यात आला, ज्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here