Mumbai : चेंबूर येथील घाटले गाव परिसरातील नाल्याचे रुंदीकरण

0
179
Mumbai : Widening of drain in Ghatle village area of ​​Chembur

मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांच्या प्रयत्नाने आणि पालिकेच्या वतीने चेंबूर येथील घाटले गाव(Ghatle village) परिसरातील वैभवनगर ते मोर्या प्रतिष्ठानपर्यंतच्या नाल्याचे रूंदीकरण आणि त्यावर स्लॅब टाकून रस्ता बनविण्यात येणार आहे.

या कामाचे भूमिपूजन स्थानिक रहिवाशांच्या उपस्थित पार पडले. यावेळी बोलताना अनिल पाटणकर(Anil Patankar) म्हणाले की, सुमारे ७ ते ८ कोटींचे हे नागरी विकासकाम असून, ते येत्या जानेवारीपर्यंत म्हणजेच पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचा मानस आहे. पावसाळ्यात येथील रस्ता पूर्णपणे पाण्याखाली जात असतो, त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यासाठी या नाल्याचे रुंदीकरण आणि त्याची खोली वाढविण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून केले जाणार आहे.

दरम्यान, याप्रसंगी स्टर्लिंग बिल्डकाॅमचे निलेश मोदी, उपविभागप्रमुख महेंद्र नाकटे, महिला उपविभाग संघटिका सुलभा पात्याने, शाखाप्रमुख उमेश करकेरा, महिला शाखा संघटिका योगिता म्हात्रे, मीनाक्षी पाटणकर, ज्येष्ठ शिवसैनिक शशिकांत घाग, स्थानिक समाजसेविका मीनाक्षी पाटणकर आणि शिवसेना पदाधिकारी, तसेच नागरिक(citizens) उपस्थित होते.