
प्रशांत बारसिंग
मुंबई : नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या विद्यापीठाच्या वारंगा येथील स्थायी कॅम्पसमधील शैक्षणिक संकुल मुलामुलींचे वसतिगृह ॲमेनिटी ब्लॉक व प्रशासकीय संकुल या इमारतींमध्ये हिटिंग, व्हेटिलेशन व एअर कंडिशन यंत्रणा लावण्यात येणार आहेत.