Turkey : भीषण बॉम्बस्फोटात चार जणांचा मृत्यू, तर 11 जखमी

0
173

Indiagroundreport वार्ताहर
इस्तंबूल : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूल(Istanbul) शहर रविवारी भीषण स्फोटाने हादरले. या स्फोटाने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या भीषण स्फोटात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ११ जण जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींना पोलिसांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तुर्कस्तानच्या माध्यमांच्या माहितीनुसार, इस्तंबूल शहरातील गर्दीच्या ठिकाणी रविवारी हा बॉम्बस्फोट झाला. सदर बॉम्बस्फोट(bombblast) हा सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान झाल्याची माहिती मिळत आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

सदर बॉम्बस्फोटाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये लोक रस्त्यावरून चालताना दिसत आहे. त्यानंतर अचानक भीषण स्फोट झाला. स्फोट झाल्यामुळे लोकांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले. लोक जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी पळताना दिसत आहेत.

दरम्यान, इस्तंबूल शहरात ज्या ठिकाणी हा स्फोट झाला. त्या ठिकाणी अनेक दुकाने(shops) आणि रेस्ट्रो आहेत, त्यामुळे या ठिकाणी लोकांची वर्दळ असते. या ठिकाणी पर्यटक आणि स्थानिक मोठ्या प्रमाणात येत असतात.