spot_img

Mumbai : ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होणार राष्ट्रवादीचे नेते

प्रशांत बारसिंग
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’च्या(‘Bharat Jodo Yatra’) दरम्यान महाराष्ट्रातील यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी सोमवारी दिली.

येत्या १० नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. शिवाय, जाहीर सभेलाही राष्ट्रवादीचे(NCP) नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती महेश तपासे यांनी दिली

Explore our articles