spot_img

Mumbai : फेरीवाल्यांवरील कारवाईनंतर घाटकोपरवासियांनी घेतला मोकळा श्वास

Mumbai: Ghatkopar residents breathed a sigh of relief after the crackdown on hawkers

ही कारवाई रोज सुरू राहणार; अवैध्य फेरीवाल्यांवर दाखल होणार गुन्हे
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
घाटकोपर पश्चिमेकडील(Ghatkopar West) अनेक भररस्त्यांवर गेल्या काही वर्षांपासून फेरीवाल्यांनी बस्तान मांडल्याने नागरिकांना ये-जा करणे मुश्किल झाले होते, मात्र गेला आठवडाभर पालिकेची कारवाई सुरू असल्याने येथील रस्ते आता मोकळे झाले आहेत. त्यामुळे घाटकोपरवासियांनी आता बऱ्याच काळानंतर मोकळा श्वास घेतला आहे. मात्र असे असले तरीही यापुढे ही कारवाई रोज करण्यात येणार आहे. तरीही फेरीवाले जुमानत नसतील तर त्यांच्यावर थेट पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येईल, असे घाटकोपर एन-विभागाचे सहाय्यक पालिका आयुक्त संजय सोनवणे यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात येथील शेकडो अवैध्य फेरीवाल्यांवर(illegal hawkers) पालिकेने धडक कारवाई केली आहे. एक एका दिवशी तब्बल ३-३ ट्रक वस्तू जप्त केल्या होत्या, त्यामुळे घाटकोपरमधील नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. आताही अशी कारवाई सुरूच असून, भविष्यातही ती आणखी कडक केली जाणार आहे, असे संजय सोनवणे याबाबत बोलताना म्हणाले.

पालिका उपायुक्त(Municipal Deputy Commissioner) देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईने वेग घेतला असून, वेळ पडली तर भररस्त्यावर उच्छाद मांडणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही संजय सोनवणे यांनी यावेळी दिला आहे.

येथे कारवाईचे पॉईंटस्-

घाटकोपर पश्चिम येथील खोत गल्ली(Khot Galli), तसेच बाजूचे अनेक वर्दळीचे रस्ते, रेल्वे स्थानक रस्ता परिसर, श्रद्धानंद रोड, महात्मा गांधी रोड या रस्त्यांवरील गेल्या अनेक वर्षांपासून बस्तान मांडलेल्या फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. यापुढील टार्गेट ही ठिकाणे असणार आहेत. येथूनच मागच्या आठवड्यात ३ ट्रक माल ताब्यात घेण्यात आला होता.

Explore our articles