spot_img

Thane : स्टेशन तिकीट खिडक्याजवळ पडलेत खड्डे

समर प्रताप सिंग
ठाणे : ठाणे स्टेशन परिसरात(Thane station area) तिकीट खिडक्याच्या आसपास लाद्या उखडल्याने पडलेल्या खड्ड्यांचा त्रास प्रवाशांना होत आहे. प्रवाशी संघटनेच्यावतीने रेल्वे प्रशासनाला तक्रारी करून जाणीव केल्यानंतरही कुठलीच कारवाई होत नसल्याची खंत प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी व्यक्त केली.

ठाणे स्थानकांवर येणाऱ्या लाखो प्रवाशांना(passengers) सुखकर प्रवासातही रेल्वे प्रशासनाने कोट्यवधींचा खर्च करीत विविध सुविधा दिलेल्या आहेत, त्यामुळे प्रवाशांना मुलांना, अपंगांना याचा लाभ मिळत असताना तिकीट खिडकीजवळ पडलेल्या खड्ड्यात अनेक छुटपूट घटना घडत असतात. अनेकवेळा खड्ड्यात चुकीने पाय पडल्याने दुखापतीचे प्रकार घडलेले आहेत, त्यामुळे स्वच्छ-सुंदर ठाणे स्टेशनला आणि स्टेशनच्या लौकिकाला लागेलला हा कलंक असल्याचा आरोप नंदकुमार देशमुख यांनी केला आहे.

ठाणे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आणि येणे-जाणे असलेला तिकीट खिडकी(ticket window) परिसर आहे. या ठिकाणच्या लाद्या उखडलेल्या असल्याने प्रवाशांना याचा त्रास होत आहे. लाद्या बसवा, अशी मागणी निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासन आणि पालिकेकडे करण्यात आलेली आहे, मात्र कुठलीच दखल घेण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे, हे दुःखद आहे, असे नंदकुमार देशमुख(अध्यक्ष-उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था) यांनी म्हटले आहे.

Explore our articles