spot_img
HomeUncategorizedThane : ऍन्टी करप्शन ब्युरोच्यावतीने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

Thane : ऍन्टी करप्शन ब्युरोच्यावतीने दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम

Thane: Various programs on the occasion of Vigilance Awareness Week by Anti Corruption Bureau

Indiagroundreport वार्ताहर
ठाणे : (Thane)
दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त ऍन्टी करप्शन ब्युरोच्यावतीने(Anti-Corruption Bureau) विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. ऍन्टी करप्शन ब्युरोच्यावतीने नवी मुंबईत कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऐरोली रेल्वे स्टेशन, बस स्थानक आदी परिसरामध्ये पथनाटय सादर करून जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे उरण कोर्ट, सिडको कार्यालय, तसेच वाशी येथील किराणा बाजार व दुकाने निरीक्षक कार्यालय इत्यादी शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर ऍन्टी करप्शन ब्युरोची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात आले व उपस्थित नागरिकांना हॅन्डबिल वाटून जनजागृती करण्यात आली.

त्याचप्रमाणे, ऍन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ठाणे येथील कान्हेरी हिल एअरफोर्स स्टेशन येथे उपस्थित अधिकारी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यप्रणालीबाबत माहिती दिली. तसेच ठाणे(Thane) येथील ठाणे महानगरपालिका, कषि विभाग, आरटीओ, राज्य उत्पादन शुल्क, मुख्य वनसंरक्षक, जिल्हा परिषद, भूमि अभिलेख, नियोजन भवन, जिल्हा कोषागार, शिधावाटप कार्यालय, सहदुय्यम निबंधक, पंचायत समिती, तलाठी, ठाणे नगर पोलीस स्टेशन इत्यादी शासकीय कार्यालयाच्या दर्शनी भागावर ऍन्टी करफ्शन ब्युरोची माहिती असलेले स्टिकर्स लावण्यात आले व उपस्थित नागरिकांना हॅन्डबिल वाटण्यात आले.

तसेच पालघर येथील वाडा(Wada), विक्रमगड, मनोर इत्यादी कार्यालयांच्या दर्शनी भागावर ऍन्टी करप्शन ब्युरोचे स्टिकर्स लावण्यात आले. त्याचप्रमाणे नागरिकांना भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या सरकारी नोकराविरुध्द(अधिकारी, कर्मचारी) तक्रार असल्यास नागरिकांनी पोलीस अधीक्षक ऍन्टी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे मध्यवर्ती कारागृहासमोर, ठाणे(प.) 400601 या पत्त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर