
वसई : शासकीय कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधी यांना १० व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी होणाऱ्या स्पर्धा नोंदणी शुल्कामधून १०० टक्के सवलत.
१० वी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धा व इतर शालेय स्पर्धांचे आयोजन रविवार दिनांक ११ डिसेंबर, २०२२ रोजी होणार आहे. या स्पर्धेमध्ये संपूर्ण देशभरातून स्पर्धक भाग घेत असतात, त्याबरोबर या स्पर्धेमध्ये शासकीय कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी हे देखील स्पर्धेमध्ये भाग घेत असतात. शासकीय कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच माध्यम प्रतिनिधी यांना स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी होणाऱ्या स्पर्धा नोंदणी शुल्कामधून सवलत देणेबाबत महानगरपालिकेला विविध निवेदने प्राप्त झाली होती. त्यानुषंगाने मा.आयुक्त तथा प्रशासक यांनी शासकीय कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधी यांना १० वी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी होणाऱ्या स्पर्धा नोंदणी शुल्कामधून १०० टक्के सवलत देणेचा ठराव संमत केला आहे. तरी शासकीय कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी, पोलीस अधिकारी, महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच प्रसार माध्यम प्रतिनिधी यांमधून मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी क्रीडा विभाग, वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय, विरार (पूर्व) येथे संपर्क साधावा. संबंधितांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची अंतिम तारीख ०६ डिसेंबर २०२२ ही आहे. याची कृपया नोंद घ्यावी.


