
चितळसर आणि श्रीनगर पोलिसांनी केली दोघांना अटक
ठाणे : श्रीनगर आणि चिटलसार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हद्दपारीची नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोघा आरोपीना श्रीनगर पोलीस आणि चितळसर पोलिसांनी प्रत्येकी एक अशा दोन आरोपीना अटक करण्याची कारवाई केलेली आहे. श्रीनगर मधील आरोपी लक्ष्मण शाम देवरस,याला सहा महिन्याची हद्दपारी तर चितळसर मधील आरोपी तिरूपती ऊर्फ अर्थव जीवनराव मुंडकर याला २ वर्षासाठी हद्दपार केले होते. मात्र आदेशाचे उल्लंघन करीत ते परिसरातच वास्तव्य करताना आढळले म्हणून अटकेची कारवाई केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवाया केल्या प्रकरणी ठाणे पोलिसांनी आरोपी लक्ष्मण शाम देवरस, (38) रा. वागळे इस्टेट, ठाणे (प.) याला ठाणे, मुंबई शहर व मुंबई उपनगर, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातून सहा महिने तडीपार केले होते. ३० जुलै, २०२२ रोजी आदेशाची अंमलबजावणी पोलिसांनी केली. मात्र १ डिसेंबर रोजी ४-३६ वाजण्याच्या सुमारास देवरस हा संतोषी माता चाळ, वागळे इस्टेट, ठाणे (प.) येथे खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला. त्याला अटक करून पथकाने श्रीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. तर आदेशाचे उल्लंघन प्रकरणी दुसरी कारवाई चितळसर पोलीस ठाण्याने केली. आरोपी तिरूपती ऊर्फ अर्थव जीवनराव मुंडकर,(24 )रा. भवानी नगर, ठाणे (प.) याला ठाणे पोलिसांनी दोन वर्षासाठी हद्दपार केले. पॉलॉईस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कारवायांबाबत १४ एप्रिल,२०२२ रोजी तडीपार कर्णयचे आदेश आणि अंमलबजावणी केली. मात्र आरोपी मुंडकर हा सुभाषनगर, ठाणे प. येथे खंडणी विरोधी पथकच्या जाळ्यात अडकला. आरोपी देवरस आणि मुंडकर यांच्या विरोधात सरकारच्यावतीने गुन्हा दाखल करून अटक केल्याची कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.


