
समर प्रताप सिंग
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांनंतर आता एक वपोनि बदली, २ पोलीस निरीक्षकांच्या(Police Inspectors) पदोन्नती करीत नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. तर, एक पदोन्नती करीत सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या(Thane Police Commissionerate) कार्यालयीन बदल्यांच्या आणि पदोन्नतीच्या १६ नोव्हेंबरच्या पत्रकानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल विलासराव राऊत या शांतीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. त्यांची बदली ठाणे मुख्यालय प्रिझन एस्कॉर्ट येथे वपोनि म्हणून करण्यात आलेली आहे. तर, पोलीस निरीक्षक किरणकुमार दशरथ कबाडी हे शांतीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांची पदोन्नती करीत त्यांना ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. पोलीस निरीक्षक शंकर आनंदराव इंदलकर हे ठाणे नियंत्रण कक्षात कार्यरत होते. त्यांना पदोन्नती देत त्यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून शांतीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर, गुन्हे अन्वेषण विभाग विशेष शाखा-१ चे वपोनि गजानन लक्ष्मण काब्दुले यांना पदोन्नती देत त्यांची नियुक्ती सहाय्यक पोलीस आयुक्त वागळे विभाग येथे करण्यात आलेली आहे.