
विविध प्रकरणी १७७ गुन्हे नोंदवित १८४ आरोपींना ठोकल्या बेड्या
ऑपरेशन दरम्यान वाहतूक पोलिसांचीही धडक कारवाई
समर प्रताप सिंग
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठाणे पोलिसांनी संयुक्तरित्या राबविण्यात आलेल्या “ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन” अंतर्गत केलेल्या कारवाईत विविध गुन्ह्यांप्रकरणी १७७ गुन्हे नोंदविण्यात आले, तर १८४ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, दुसरीकडे वाहतूक पोलिसांनी(traffic police) वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून दंडापोटी १६५३ जणांवर कारवाई करीत १० लाख ७ हजार २०० रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे.
ठाणे पोलिसांनी(Thane Police) २३ नोव्हेंबर, २०२२ रोजी रात्री ९ वाजता हे ऑपरेशन सुरु केले. ते ऑपरेशन २४ नोव्हेंबर, २०२२ रोजी दुपारी १ वाजेपर्यंत चालले. सदरची कारवाई पोलीस सहआयुक्त, अपर पोलीस आयुक्त(पूर्व व पश्चिम) प्रादेशिक विभाग, अपर पोलीस आयुक्त(गुन्हे), सर्व परिमंडळीय पोलीस उपआयुक्त, पोलीस उपआयुक्त (गुन्हे), पोलीस उपआयुक्त(वाहतूक) यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व गुन्हे शाखेतील सर्व घटकांचे प्रभारी अधिकारी यांच्यामार्फत गुन्हेगारी कृत्याला आळा बसण्याकरिता करण्यात आली. या “ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन” अंतर्गत अवैध शस्त्र जप्ती, अग्नीशस्त्रे जप्ती, फरारी पाहिजे, आरोपीत अटक करणे, हॉटेल, लॉजेस, डान्सबार तपासणे, पब, हुक्कापार्लर, पॅरोल आदेशाचे उल्लंघन केलेल्या आरोपींचा शोध घेणे, वाहने तपासणे, अभिलेखावरील हिस्ट्रीशूटर व गुंड तपासणे, स्टँडिंग व अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करणे, ऑटोरिक्षा व मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई, झोपडपट्ट्या व संवेदनशील ठिकाणे यांची तपासणी करून संशयित इसमावर प्रतिबंधक कारवाई, पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. सदरची कारवाई ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथ या भागात ऑल आऊट मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेकरिता(campaign) २८५ पोलीस अधिकारी व १३११ पोलीस अंमलदार इतके मनुष्यबळाचा वापर करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

पाच परिमंडळात केलेल्या कारवाईचा तपशील :
प्रकार नोंद गुन्हे अटक आरोपी
अवैध शस्त्र बाळगणे ————————१२ —————–१३
१४२ कलमाचे उल्लंघन ———————१६ ——————१६
अवैध सुरु आस्थापना ———————–३४ ——————५४
दारूबंदी गुन्हे ——————————-६८ ——————४६
जुगार अड्डे कारवाई ———————— ०९ —————— ०७
अमली पदार्थ ——————————- ३५ ——————-३५
पाहिजे, पेरोल, फरारी ———————- ०० ——————१०
वॉरंट, अजामीन वॉरंट ——————— ०३ —————— ०३
१७७ १८४
वाहतूक विभागानेही “ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन” अंतर्गत केलेल्या कारवाईत १,६५३ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाईत २३ पोलीस अधिकारी आणि ११८ अंमलदार मनुष्यबळाचा वापर.
प्रकार कारवाई दंड
ऑटो रिक्षा कारवाई ———————२२२ ——————रु. १,७७,२००
ड्रिंक अँड ड्राईव्ह ————————-०९१ ————–न्यायालयात प्रकरणे
विना परवाना वाहन चालविणे ———– ४२———————रु. १,६०,५००
विनागणवेश —————————— ८९ ——————–रु. ५९,५००
विनाहेल्मेट प्रवास ———————– ५९५ ——————–रु. ३,१७,२५०
सिग्नल जम्पिंग —————————– ४५ ——————–रु. २३,५००
सीटबेल्ट न लावणे ————————२३४ ———————रु. ५३,७००
मोबाईलवर बोलणे ————————०३४ ———————रु. ३५,०००


