spot_img

Thane : पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी-पोलीस

महासंचालकाने केले २५ जणांना सन्मानित

ठाणे : ठाणे पोलीस दलातील विविध विभागात कर्तव्यावर असताना केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दाखल घेत पोलीस महासंचालकाद्वारे ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील विविध विभाग आणि पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अधिकारी याना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आलेले आहे. यात एक उपायुक्त आणि पोनि -३,सपोनि-१, सपोउपनि-६,पोहवा-७, पोना-६, पोशि-१ यांचा समावेश आहे. ठाणे पोलीस दलातील गुन्हे शाखा, अन्य पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामगिरीच्या अनुषंगाने सदरचा सन्मान करण्यात आलेला आहे. सध्या ठाणे लाचलुचपत विभागात कार्यरत असलेले पोलीस उप आयुक्त सुनील लोखंडे यांचीही भरीव कामगिरी सन २०२२ मध्ये ठरली आहे. या वर्षाच्या ११ महिन्यात लाच घेणाऱ्या विविध विभागात सापळे रचून ७७ कारवाई यशस्वीरीत्या करण्यात आलेली आहे. तर वागळे इस्टेट गुन्हे शाखा युनिट-५ चे पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या गुन्हेगारीवर आघात करणाऱ्या कारवाया केल्याची दाखल घेण्यात आलेली आहे. १९९६ साली पोलीस उपनिरीक्षक म्हणून पोलीस दलात आलेले पोनि विकास घोडके यांनी विविध पोलीस विभागात यशस्वीरीत्या कर्तव्य बजावले. त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरीबाबत त्यांना अनेक पुरास्कार मिळालेले आहेत.

पोनि विकास घोडके यांची कारवाई

एटीएस मध्ये इराक येथे दहशतवादी संघटनेत गेलेल्या तरुणाला अटक
गँगरेप आरोपीना अवघ्या सहा तासात अटक
शस्त्र विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या
अलीकडेच ठाण्यात गोळीबार आणि खून करणाऱ्या आरोपीना १२ तासात अटक
आठ कोटीच्या बनावट नोटा पकडून रॅकेट उध्वस्त केले.

पोलीस महासंचालक सन्मानित अधिकारी-कर्मचारी यांची नावे

पोलीस उप आयुक्त सुनिल लोखडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे)

पोलीस निरीक्षक

पोनि विकास शिवाजी मोडके (गुन्हे शाखा ठाणेशहर)
पोनि गजेद्र पाटील (नि. कक्ष ठा)
पोनि अल्का सदाशिव देशमुख(गुन्हे शाखा ठाणे)

सपोनि

सपोनि सुभाष विष्णु माने (मुख्यालय ठाणे सेवानिवत)

सपोउपनि

सपोउपनि सत्यवान आत्माराम सावंत (कळवा पो.स्टे)
सपोउपनि विजय कुमार दशरथ गो-हे (कळवा पो स्टे)
सपोउपनि वाल्मीक ओंकर कुमावत (गुन्हे शाखा ठाणे शहर)
सपोउपनि राजु जयराम महाले (गुन्हे शाखा ठाणे शहर)
सपोउपनि सुभाष वामन साळवी (गुन्हे शाखा ठाणे शहर)
सपोउपनि विवेकानंद कृष्णाजी जोशी (बिनतारी संदेश विभाग ठाणे शहर)

पोलीस हवालदार

मपोहवा ज्योती प्रमोद अनुसे (कोपरी पो.स्टे.)
मपोहवा अरुणा अजित वामन (कळवा पो स्टे)
पोहवा नितीन रामराव पाटील (नियंत्रण कक्ष ठाणे शहर)
पोहवा शिवाजी पंडीत गायकवाड (निजामपुरा पो.स्टे)
मपोहवा नजिता योगेश आरेकर (गुन्हे शाखा ठाणे शहर)
पोहवा बजरंग शंकर गोसावी (गुन्हे शाखा ठाणे शहर)
चालक-पोहा संतोष बळवंत सुर्वे (गुन्हे शाखा ठाणे शहर)

पोलीस नाईक

पोना बाबासाहेव सोपान जाधव (हिललाईन पो. स्टे)
पोना सेजल कैलास भारुडे (गुन्हे शाखा ठाणे शहर)
पोना सुहास रघुनाथ खताते (गुन्हे शाखा ठाणेशहर)
पोना मनोज प्रभाकर चौधरी (शांतीनगर पो.ठा )
पोना दादासाहेब पंढरीनाथ पाटील (गुन्हे शाखा ठाणे शहर)
मपोना देवकी देवसिंग राजपूत (वागळेइस्टेट पो. स्टे)

पोलीस शिपाई

गजेंद्र सोनटक्के (वर्तकनगर पो. ठा)

New Delhi : थाईलैंड से 4 भारतीय श्रमिकों को सुरक्षित घर वापसी

नई दिल्ली : (New Delhi) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (National Human Rights Commission) (एनएचआरसी) के हस्तक्षेप के बाद विदेश मंत्रालय (Ministry of External Affairs) ने...

Explore our articles