
समर प्रताप सिंग
ठाणे : भिवंडी निजामपुरा शहर महानगरपालिका अंतर्गत तहसीलदार ऑफिस ते शांतिनगर चौक(Shantinagar Chowk) दरम्यान दोन्ही वाहिनीवर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार असून, रस्त्याचे खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
प्रवेश बंद : तहसीलदार ऑफिस(दिघे चौक) ते अमजदिया मस्जिदपर्यंत दुचाकी, तीन चाकी व लहान वाहनांकरिता एकेरी वाहतूक करण्यात येत आहे. नमूद मार्गावरुन तहसीलदार ऑफिस(दिघे चौक) कडून अमजदिया मस्जिदकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना(Heavy vehicles) दिघे चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : सदरची वाहने तहसीलदार ऑफिस(दिघे चौक) ते नागाव मार्गे, तसेच तहसील ऑफिस(दिघे चौक) ते मुरलीधर कम्पाउंडकडून अमजदिया मस्जिद मार्गे इच्छितस्थळी जातील.
प्रवेश बंद : शांतिनगर के. जी. एन. चौक येथून दिघे चौकाकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना अमजदिया मस्जिद येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग : सदरची वाहने शांतिनगर के. जी. एन. चौक येथून वफा जंक्शनकडून डावीकडे वळण घेवून अमजदिया मस्जिद समोरून सुभाषनगर मार्गे बाबला कंपाउंड व मुरलीधर कंपाउंडमार्गे, तसेच अमजदिया मस्जिद येथून नागाव मार्गे इच्छितस्थळी जातील.
प्रवेश बंद : शांतिनगर के. जी. एन. चौक येथून आनंद दिघे चौककडे जाणाऱ्या लहान वाहनांना(दुचाकी, तीन चाकी) पंचायत समिती क्वॉर्टर्स येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग : सदरची वाहने शांतिनगर के. जी. एन चौक येथून पंचायत समिती क्वॉर्टर्समार्गे डावीकडे वळन घेवून साईनगरमार्गे अशोकनगर(Ashoknagar) गेट नं. 1 व नं. 2 येथून इच्छितस्थळी जातील.
ही वाहतूक अधिसूचना रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार राठोड(Vinaykumar Rathod) यांनी कळविले आहे.