spot_img

Thane : ‘ते’ परिसर तंबाखूमुक्त करण्यासाठी करावी कारवाई : अशोक शिनगारे

Thane: Action should be taken to make 'that' area tobacco free: Ashok Shingare

समर प्रताप सिंग
ठाणे : (Thane)
जिल्ह्यातील शासकीय कार्यालये व शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूमुक्त घोषित करण्यासंदर्भात तातडीने कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी(Collector) अशोक शिनगारे यांनी दिले आहेत.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालय समिती सभागृह येथे झाली. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संगीता माकोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा दंतशल्यचिकित्सक डॉ. अर्चना पवार यांच्यासह, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य, तबाखू नियंत्रण कक्षाचे अधिकारी, सलाम मुंबई फाऊंडेशनसह जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ठाणे जिल्हा परिषद(Thane Zilla Parishad) अंतर्गत सर्व प्राथमिक आरोग्यकेंद्रे, तसेच उपकेंद्रे लवकरात लवकर तंबाखूमुक्त करण्याची कार्यवाही करावी, तसेच जिल्ह्यातील सर्व शिक्षण संस्थांनी आपल्या संस्थेचा परिसर तंबाखूमुक्त करावा. जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय संस्थांमध्ये तंबाखूमुक्त(tobacco-free) पेटी बसविण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. यावेळी उपस्थितांना तंबाखूमुक्त शपथ देण्यात आली.

Raipur : पुलिस ने 40 लाख के 200 गुम मोबाइल खोजकर उनके मालिकों को सौंपा

रायपुर : (Raipur) रायपुर पुलिस (Raipur police) द्वारा मंगलवार को लगभग 40 लाख रुपये कीमत के गुम हुए 200 नग मोबाइल फोन को ढूंढ...

Explore our articles