spot_img
HomeUncategorizedThane : घराचा दरवाजा लॉक झाल्याने अडकला 62 वर्षीय मनोरुग्ण

Thane : घराचा दरवाजा लॉक झाल्याने अडकला 62 वर्षीय मनोरुग्ण

समर प्रताप सिंग
ठाणे : ठाण्याच्या कोपरी परिसरातील राधाकृष्ण मंदिरासमोर असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावरील घराचा दरवाजा लॉक झाल्यामुळे यात ६२ वर्षीय मनोरुग्ण अडकल्याने खळबळ उडाली. आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमनदलाच्या टीमने(fire brigade) अखेर लॉक तोडून मनोरुग्ण उमेश काळे(६२) यांची सुखरूप सुटका केली.

कोपरी(Kopri) परिसरातील गोदावरी इमारत, मंगला हायस्कूलजवळ, राधाकृष्ण मंदिरसमोर, कोपरी, ठाणे ही ३ माळ्याची इमारत असून, याच्या दुसऱ्या माळ्यावर मनोरुग्ण उमेश काळे हे राहतात. अचानक त्यांच्या रूमचा दरवाजा लॉक झाला. यानंतर घटनास्थळी कोपरी पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी १ पिकअप वाहनासह, अग्निशमनदलाचे जवान उपस्थित झाले. त्यांनी डोअर ब्रेकरच्या सहाय्याने लॉक तोडून सदर व्यक्तीस सुखरूप बाहेर काढून नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

spot_imgspot_imgspot_img
इससे जुडी खबरें
spot_imgspot_imgspot_img

सबसे ज्यादा पढ़ी जाने वाली खबर