
Indiagroundreport वार्ताहर
सोलापूर : (Solapur)सोलापूर व चिखली(Chikhli) बाजार समितीमध्ये सोयाबीनला यंदाचा सर्वोच्च ६ हजार रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळाला आहे. उत्पादनात झालेली घट पाहता भविष्यात दरात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यंदाच्या अतिवृष्टीने सोयाबीनच्या(soybeans) उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी बाजारात आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात ४ ते ५ हजारावर असलेले सोयाबीनचे दर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ६ हजारावर गेले आहेत.
मागीलवर्षी अचानक १० हजारांवर गेलेला दर आवक होताच ५ हजारांवर आला होता. यंदा सोयाबीनची आवक सुरू होताच दरात तेजी दिसत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात प्रतिक्विंटल सरासरी १ हजाराची वाढ झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये(market committee) होत असलेली आवक व दर पाहता आवक घटताना, तर दर वाढताना दिसत आहे. लातूर(Latur), अमरावती, नागपूर, लासलगाव, माजलगाव, सोलापूर यासह प्रमुख बाजार समित्यांमध्ये आवक कमी आहे, पण दरात तेजी दिसून आली.