spot_img

Sindhudurg : मत्स्यशेती आणि शेतकऱ्यांसाठी भरीव तरतुदीची मागणी

Indiagroundreport वार्ताहर
सिंधुदुर्ग : (Sindhudurg)
सिंधुदुर्ग(Sindhudurg) जिल्ह्यात मत्स्यशेतीचा व्यवसाय प्राथमिक स्वरूपात आहे. भविष्यात मत्स्यशेतीमधून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, तसेच मत्स्य शेतकरी यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो, त्यासाठी मत्स्यशेती व मत्स्य शेतकरी यांना भरीव निधी द्यावा, अशी मागणी आत्मनिर्भर मत्स्य शेतकरी समन्वयक रवीकिरण तोरस्कर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार(Sudhir Munguntiwar) यांनी नुकतेच मत्स्यबीजनिर्मितीकरिता लागणारे साहित्य प्रजनक साठा व मत्स्यबीजाकरिता खाद्य, संप्रेरके, तलाव व्यवस्थापनकरिता लागणारे खत, रासायनिक द्रव्य, जाळे, मजुरी, सामग्री पुरवठा, लहान बांधकामे यासाठी जिल्हा वार्षिक नियोजनमार्फत निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आज रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यशेतीचा व्यवसाय प्राथमिक स्वरूपात आहे. भविष्यात मत्स्यशेतीमधून(Fish farming) मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, तसेच मत्स्य शेतकरी यांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो, म्हणूनच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन बैठकीमध्ये जिल्ह्यातील मत्स्यशेतीला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद व्हावी.

Explore our articles