spot_img

Ratnagiri : अप्पर पोलीस अधीक्षकपदी जयश्री गायकवाड यांची नियुक्ती

Ratnagiri: Jayashree Gaikwad appointed as Upper Superintendent of Police

Indiagroundreport वार्ताहर
रत्नागिरी : (Ratnagiri)
रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची कोल्हापूर येथे बदली झाली असून, त्यांच्या जागी गडहिंग्लज(कोल्हापूर) येथील अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड(Jayashree Gaikwad) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच त्या आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई(Jayashree Desai) परिवीक्षाधीन कालावधीत रत्नागिरीत होत्या. त्यानंतर बढतीने अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून गेली दोन वर्षे त्या रत्नागिरीत कार्यरत होत्या. जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघड करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

नूतन अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यापूर्वी रत्नागिरी शहर उपविभागीय अधिकारी होत्या. यावेळी त्यांनी अनेक गुन्हे उघड केले होते, त्यानंतर लांजा डीवायएसपी म्हणून त्यांनी काम केले होते. विभागातील पोलीस ठाण्यांतर्गत सर्व भागांची त्यांना परिपूर्ण माहिती होती. त्यांची नियुक्ती रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी झाल्याने त्याचा फायदा जिल्ह्यातील गुन्ह्यांची उकल(solving crimes) करताना होणार आहे.

Explore our articles