Rajasthan : एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद मृत्यू

0
324
Rajasthan: Suspicious death of six people from the same family

Indiagroundreport वार्ताहर
जयपूर : (Jaipur)
उदयपूर(Udaipur) जिल्ह्यातील गोगुंडा शहरात एकाच घरातील सहा व्यक्ती मृत पावले आहेत. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सकाळी गावकऱ्यांनी घरात पाहिले असता, चार लहान मुले आणि एक दांपत्य मृतअवस्थेत आढळून आले. सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतांचे शव ताब्यात घेण्यात आले आहेत.

सदर घटना गोगुंडा पोलीस स्टेशन(Gogunda police station) हद्दीतील आहे. पोलिसांनी कुटुंबातील सहा व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. सदर घटना ही हत्येची आहे की आत्महत्येची याबाबत अद्याप ठोस माहिती समजू शकलेली नाही. गोगुंडा पोलिसांचे एक पथक या घटनेचा तपास करीत आहे.