Pune : एसएफआय राज्य अध्यक्षपदी सोमनाथ निर्मळ, तर सचिवपदी रोहिदास जाधव यांची एकमताने निवड

0
205

स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे १८वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन संपन्न

दीपक पवार
पुणे : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI)चे ३ दिवस चाललेले १८वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन पुण्यातील जुन्नर येथे रविवारी संपन्न झाले. या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी सोमनाथ निर्मळ, तर सचिवपदी रोहिदास जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली.

या अधिवेशनात एसएफआयची नवीन महाराष्ट्र राज्य कमिटी निवडली गेली. किल्ले शिवनेरी(Fort Shivneri) जुन्नर येथे झालेल्या या राज्य अधिवेशनात नवीन ४१ सदस्यांची राज्य समितीची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये सोमनाथ निर्मळ यांची राज्य अध्यक्षपदी, तर राज्य सचिवपदी रोहिदास जाधव यांची निवड करण्यात आली. तसेच, राज्य उपाध्यक्षपदी भास्कर म्हसे(ठाणे-पालघर), मल्लेशम कारमपुरी (सोलापूर), सत्यजित मस्के(संभाजीनगर), तर राज्य सहसचिवपदी विलास साबळे (पुणे), लहु खारगे(बीड), रामदास(मुंबई) यांची निवड करण्यात आली. यासोबतच राज्य सचिव मंडळात नवनाथ मोरे(पुणे), विजय लोहबंदे, संतोष जाधव(बीड), पल्लवी बोराडकर(संभाजीनगर) आणि सायली अवघडे(सातारा) यांचा समावेश आहे. या अधिवेशनाला राष्ट्रीय महासचिव मयुख बिश्वास, राष्ट्रीय उपाध्यक्ष बालाजी कलेटवाड, राष्ट्रीय सहसचिव दिनित देंटा आदी उपस्थित होते.

या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या(students) विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच, विद्यार्थ्यांच्या विविध विषयांसंदर्भात ठराव मांडून ते पारित करण्यात आले. राज्यभरातील २१४ प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले होते. यावेळी ३ वर्षांच्या अहवालावर चर्चा करून शैक्षणिक मागण्यांचे ठराव पारित करण्यात आले.

यावेळी कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, महिलांवरील अत्याचाराविरोधातील लढा तीव्र करा, नोकरभरती त्वरीत करा, धर्मांध शक्तींविरोधातील(fanatical forces) लढा तीव्र करा, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करा, आदींसह शैक्षणिक मागण्यांचे १५ ठराव एकमताने पारित करण्यात आले.

सोमनाथ निर्मळ हे पुण्यातील जुन्नर(Junnar) तालुक्यातील हातविज येथील रहिवासी आहेत. ते सध्या पुणे विद्यापीठात समाजशास्त्र या विषयावर पीएचडी करीत आहेत. सोमनाथ निर्मळ हे नुकतेच आपल्या संशोधनासाठी नॉर्वे(Norway) येथे जाऊन आलेले आहेत.