spot_img

Pune : कंत्राटी कामगारांना बोनस देण्यास तत्वत: मान्यता

Indiagroundreport वार्ताहर
पुणे : पुणे महापालिकेत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना(contract workers) कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सानुग्रह अनुदान व ८.३३ टक्के बोनस देण्याच्या प्रस्तावास आज तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्यास अंतिम मान्यता मिळाल्यानंतर सुमारे साडे आठ हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

दिवाळीमध्ये महापालिकेने(Municipal Corporation) कायम कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले, पण कंत्राटी कामगारांना काहीही मिळाले नव्हते. कंत्राटी कामगारांनाही कायद्याप्रमाणे ही रक्कम मिळणे आवश्यक आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केले असल्याने राष्ट्रीय मजदूर संघाने अनेकदा आंदोलन करून ही मागणी लावून धरली. अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी यासंदर्भात आज बैठक घेतली. यावेळी पुणे महापालिकेचे कामगार सल्लागार शिवाजी दौंडकर, मुख्य लेखापाल उल्का कळसकर, राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे, एस. के. पळसे आदी उपस्थित होते.

Explore our articles