spot_img

New Delhi : संरक्षण मंत्रालयाकडून निर्धारित प्रमाणात निवृत्तिवेतन लाभ

New Delhi: Prescribed amount of pension benefits from Ministry of Defence

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : (New Delhi)
संरक्षण क्षेत्रात(The Ministry of Defense) किमान 10 वर्ष सेवा दिलेल्या आणि केंद्रीय सार्वजनिक संस्था/केंद्रीय स्वायत्त संस्थांमध्ये किंवा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रमात कायमस्वरूपी नियुक्ती झालेल्या जेसीओ/ओआर यांना संरक्षण मंत्रालय प्रो रेटा पेन्शन अर्थात निर्धारित प्रमाणात निवृत्तीवेतन देणार आहे. याआधी हा लाभ केवळ नियुक्त असलेल्या अधिकाऱ्यांपुरताच मर्यादित होता.

संरक्षणमंत्री(Defense Minister) राजनाथ सिंह यांनी यासंदर्भात माजी सैनिक विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे आणि मंत्रालयाने आवश्यक आदेश जारी केला. या आदेशातील तरतुदीनुसार, संरक्षण सेवेत किमान 10 वर्ष पात्र सेवा दिलेले जेसीओ/ओआर या आदेशाच्या तरतुदींनुसार प्रो-रेटा पेन्शन मिळविण्यास पात्र असतील.

सार्वजनिक क्षेत्रातील संस्था/केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम(6 मार्च1985 रोजी किंवा नंतर) किंवा केंद्रीय स्वायत्त संस्था(31 मार्च 1987 रोजी किंवा नंतर) मध्ये कार्यरत/नियुक्त झालेल्या जेसीओ/ओआर यांना या तरतुदी लागू होतील. मात्र, यापूर्वीच्या प्रकरणांमधील आर्थिक लाभ हा आदेश जारी केल्याच्या तारखेपासून संभाव्यपणे मंजूर(sanction) केला जाईल.

Srinagar/Budgam : मस्जिदों पर बुलडोजर और बढ़ता ध्रुवीकरण: मीरवाइज उमर फारूक ने जताई चिंता

श्रीनगर/बडगाम : (Srinagar/Budgam) कश्मीर के प्रमुख धर्मगुरु मीरवाइज उमर फारू (Mirwaiz Umar Faroo, a prominent Kashmiri cleric) ने देश में मुसलमानों की मौजूदा स्थिति...

Explore our articles