spot_img

New Delhi : जी 20 समुहाच्या लोगोवर काँग्रेसचा आक्षेप

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी 20 समिटीच्या(G20 Summit) लोगोचे नुकतेच अनावरण केले. या लोगोमध्ये भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचा समावेश करण्यात आल्याने काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी यावर आक्षेप घेतला आहे.

येत्या १ डिसेंबर रोजी होणाऱ्या जी २० समुहाच्या शिखर परिषदेचे अध्यक्षपद भारत(India) भूषविणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मोठी प्रतिमा निर्माण करण्याची भारतासाठी मोठी संधी मानली जात आहे. मात्र, या जी 20 शिखर परिषदेच्या अगोदर मोठा वाद उभा राहिला आहे.

यावर राजनाथ सिंह यांनी म्हटले की, काही लोक कमळाला भाजपचे निवडणूक चिन्ह(symbol) म्हणूनच सांगत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी G-20 चा लोगो जारी केला आहे. या लोकांचा कमळाच्या फुलावर आक्षेप आहे. काँग्रेस बहुधा भारताचा इतिहास विसरली आहे. 1950 मध्येच कमळाला भारताचे राष्ट्रीय फूल घोषित करण्यात आले. 1857 मध्ये स्वातंत्र्य सैनिक एका हातात भाकरी आणि दुसऱ्या हातात कमळ घेऊन स्वातंत्र्यासाठी लढले. हात हे कोणत्याही राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह असेल तर ते कापले पाहिजे का? एखाद्या पक्षाचे चिन्ह जर सायकल असेल, तर सायकल वापरायची नाही का? आम्ही भारताच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेशी छेडछाड होऊ देणार नाही आणि खपवून घेणार नाही.

युरोपियन युनियनसह(European Union) 20 देशाची ही संघटना आहे. यामध्ये 20 देशांच्या प्रमुखांची वार्षिक बैठक होते, जी G-20 चे हे समीट शिखर परिषद म्हणून ओळखले जाते. या परिषदेत मुख्य विषयांवर भर दिला जातो. दहशतवाद, आर्थिक समस्या, ग्लोबल वॉर्मिंग, आरोग्य आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर या समिटमध्ये चर्चा केली जाते. या G20 देशाचा जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेत 80% वाटा आहे.

New Delhi : केंद्र ने कहा- हाई कोर्ट एयर प्यूरीफायर पर जीएसटी घटाने का आदेश नहीं दे सकता

नई दिल्ली : (New Delhi) केंद्र सरकार (Central Government) ने कहा है कि उच्च न्यायालय एयर प्यूरीफायर पर जीएसटी घटाने का आदेश नहीं दे...

Explore our articles