New Delhi : त्यासाठी भाजपची ऑफर : अरविंद केजरीवाल

0
141

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) म्हणाले की, भाजपने मला ऑफर दिली आहे की, गुजरात निवडणूक लढवू नका. आम्ही सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया
यांना सोडून देऊ.

तर, अरविंद केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्याबाबत देखील धक्कादायक माहिती सांगितली. ‘सीबीआयने देखील मनीष सिसोदिया यांची चौकशी कमी केली, मात्र त्यांना वारंवार केजरीवाल यांची साथ सोडा, तुम्हाला मुख्यमंत्री बनवू. सीबीआयने हे वारंवार सांगितले आहे’, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.

आगामी विधानसभा निवडणुकीआधीच गुजरातमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. आम आदमी पक्षाने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी(Gujarat assembly elections) जोरदार तयारी केली आहे. गुजरातमध्ये ‘आप’चा वाढता प्रभाव लक्षात घेता भाजपकडून त्यांना रोखण्याचा प्रयत्न दिसून येत आहे, अशी चर्चा आहे. याचदरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर एका वृत्तवाहिनीवर बोलताना गंभीर आरोप केले आहेत. अरविंद केजरीवालांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.