Navi Mumbai : पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह तरुणाला केली अटक

0
311

पुरुषोत्तम कनौजिया
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी पोलिसांनी(Vashi police) एका तरुणाला पिस्तूल आणि 10 जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. आरोपी जुहूगावच्या सेक्टर-11 मध्ये राहतो.

वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अविनाश मोकळे यांना गुप्त माहितीवरून एक व्यक्ती वाशी येथील मॅग्नेट बारजवळ शस्त्रांसह येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. अविनाश मोकळे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांना तसे निर्देश दिले. सूचना मिळताच रमेश चव्हाण यांनी एक टीम तयार करून मॅग्नेट बारमध्ये पाठविली. त्यातील सर्व सदस्य तेथे गेले आणि सापळा रचला. तो तरुण मॅग्नेट बारजवळ येताच पोलिसांनी त्याला येथे का आलास?, अशी विचारणा केली. यावर त्याने पोलिसांना उलटसुलट उत्तरे देण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तात्काळ त्याची झडती घेतली व त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक पिस्तूल व 10 जिवंत काडतुसे(live cartridges) आढळून आली.

पोलिसांनी ते पिस्तूल आणि काडतुसे ताब्यात घेतली आणि हे पिस्तूल इथे का आणले?, अशी विचारणा केली असता, त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून लॉकअपमध्ये टाकले. आता हे हत्यार(weapon) त्याने कोणास विकण्यासाठी आणले होते की त्याचा इतर काही हेतू होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.