spot_img

Navi Mumbai : अमली पदार्थाचा व्यापार करणाऱ्या नायजेरियनला पोलिसांनी केली अटक

Navi Mumbai: Police arrested a Nigerian who was dealing in drugs

पुरुषोत्तम कनौजिया
नवी मुंबई : (Navi Mumbai)
नवी मुंबई पोलिसांच्या(Navi Mumbai Police) गुन्हे शाखेने जुहूगाव, वाशी येथे एका नायजेरियन नागरिकाला अमली पदार्थांसह अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सुमारे 10 लाख 30 हजार रुपयांचे एमडी ड्रग जप्त केले आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासित सय्यद यांनी सांगितले की, आमच्या विभागाला एका गुप्तहेराकडून माहिती मिळाली होती की, जुहूगावच्या सेक्टर-4 मध्ये एक नायजेरियन(Nigerian) व्यक्ती ड्रग विकण्यासाठी येणार आहे. याबाबतची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बासित सय्यद यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जुहूगाव येथे जाऊन पाळत सुरू केली. त्यादरम्यान नायजेरियन व्यक्ती ज्याची पोलिसांनी झडती घेतली असता, त्याच्याकडे मेथॅक्युलोन हस(एमडी) हे औषध सापडले. आरोपीच्या ताब्यात एकूण 130 ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले असून, त्याची बाजारातील किंमत अंदाजे 10 लाख 30 हजार रुपये आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून त्याच्याकडून ड्रग्ज, मोबाईल फोन आणि स्कूटर जप्त केले. आरोपीवर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Explore our articles