
पुरुषोत्तम कनौजिया
नवी मुंबई : (NAVI MUMBAI) उरणमधील(Uran) जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टमध्ये सीमाशुल्क विभागाने नेकट्रराईन ड्रग आणि सुमारे 3 कोटी रुपयांच्या विविध मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत. सीमाशुल्क विभागाने दोन कंटेनरची तपासणी केली असता त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करीचा माल आढळून आला.
तपासणीदरम्यान, सीमाशुल्क विभागाने झेब्राची कातडी, मौल्यवान कलाकृती, लॅम्बर्टसारख्या नामवंत चित्रकाराची 38 दुर्मिळ चित्रांसह असलेला कंटेनर जप्त केला. इराणी कीवी फळाच्या एका कंटेनरच्या तपासणीत 177 मेट्रिक टन 3 कोटी रुपयांचे 32 मेट्रिक टन ड्रग्ज(drugs) सापडले.

घरगुती वस्तूंच्या नावाखाली दक्षिण आफ्रिकेतून(South Africa) आयात केलेल्या कंटेनरची तपासणी करताना लॅरी नॉर्टन आणि लॅम्बर्ट यांच्या 38 दुर्मिळ चित्रांसह, झेब्राच्या कातड्यांसह मौल्यवान कलाकृती सापडल्या. परदेशातून येणाऱ्या काही कंटेनरमध्ये तस्करीचा माल आणला जात असल्याची गुप्त माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाने तेथे जाऊन तपासणी केली असता त्यांना तेथे अनेक ड्रग्ज आणि इतर तस्करीचा माल सापडला. सीमाशुल्क विभागाने सर्व माल सील करून पुढील तपास सुरू केला आहे.


