spot_img

Navi Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जनतेला ‘गुरूनानक जयंती’च्या दिल्या शुभेच्छा

Navi Delhi: President Draupadi Murmu wished the people on 'Guru Nanak Jayanti'

Indiagroundreport वार्ताहर
नवी दिल्ली : (New Delhi:)
संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू(Draupadi Murmu) म्हणाल्या की, गुरुनानक देवजी यांच्या जयंतीच्या शुभप्रसंगी मी सर्व देशबांधवांना आणि परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना, तसेच शीख बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देते.

त्या पुढे म्हणाल्या की, गुरुनानक देवजी(Guru Nanak Devji) यांनी ‘एक ॐकार’ हा संदेश दिला. याचा अर्थ असा आहे की, परमेश्वर एक आहे आणि सर्वव्यापी आहे. त्यांनी आपल्याला प्रेम, एकता आणि बंधुभाव आचरणात आणावा यासाठी प्रेरणा दिली. ‘जपजी साहिब’ यांच्या शिकवणीतून आपण आयुष्यात सत्य, त्याग आणि नैतिक आचरण ही शाश्वत मूल्ये अंगीकारली पाहिजे. ‘किरत करो’ आणि ‘वंड छको’ हे संदेश आपल्याला प्रामाणिकपणे जगायला आणि उपलब्ध स्रोत इतरांसोबत वाटून घ्यायला प्रेरणा देतात. गुरुनानक देवजी यांनी आपल्याला नम्रता आणि मानवतेची सेवा करण्याचा संदेश दिला. त्यांची शिकवण आपल्याला शांती आणि समृद्धीच्या दिशेने मार्गदर्शन करेल. या शुभप्रसंगी आपण त्यांची शिकवण आचरणात आणुया आणि मानवतेच्या कल्याणाच्या भावनेने कार्य करुया.

Explore our articles