
Indiagroundreport वार्ताहर
नाशिक : (Nashik) मुंबईकडे येणाऱ्या ‘शालीमार एक्सप्रेस'(‘Shalimar Express’) ट्रेनच्या लगेज बोगीला अचानक नाशिक रेल्वे स्टेशन येथे ट्रेन उभी असताना आग लागली, यामुळे मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळित झाली.
आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास शालीमार एक्सप्रेसच्या लगेज बोगीस नाशिकरोड रेल्वे स्थानकात आग लागली. त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक तातडीने दाखल झाले, त्यानंतर काहीवेळात आग आटोक्यात आली. यामध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र पार्सल बोगीचे(parcel bogie) नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे रेल्वे प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली असून, मुंबईच्या दिशेने येणाऱ्या ट्रेन या ओढा, निफाड, लासलगाव व मनमाड(Manmad) स्थानकात थांबून होत्या.