
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने जळगाव यार्ड रिमॉडेलिंगमुळे(Jalgaon yard remodeling) यापूर्वी रद्द केलेल्या काही गाड्या पूर्ववत केल्या आहेत. याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
12112 अमरावती-मुंबई एक्सप्रेस JCO 5 डिसेंबर 2022,
12111 मुंबई-अमरावती एक्सप्रेस JCO 6 डिसेंबर 2022,
12105 मुंबई-गोंदिया विदर्भ एक्सप्रेस JCO 4 डिसेंबर 2022,
12106 गोंदिया-मुंबई विदर्भ एक्सप्रेस JCO 5 डिसेंबर 2022.
याशिवाय, विशेष गाडी क्र. 01266 नागपूरहून 5 डिसेंबर 2022 रोजी 15:50 वाजता सुटेल आणि 6 डिसेंबर 2022 रोजी 10:55 वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल(सेवाग्राम गाडीच्या ठिकाणी).
थांबे : अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जळकापूर, जळकापूर, जळगाव, मुर्तिजापूर, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर(Dadar).
प्रवाशांनी कृपया नोंद घ्यावी, अशी विनंती रेल्वेकडून करण्यात आली आहे.