spot_img

Mumbai : गोवर रोखण्यासाठी उपाययोजना करा : मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे यांचे महापालिकेला निर्देश

दीपक कैतके
मुंबई : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मंगळवारी दिले.

गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर एकनाथ शिंदे यांनी आज महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल(Iqbal Singh Chahal) यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच, पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून घेतले.

ज्या मुलांना लागण झाली असून रुग्णालयांत उपचार सुरू आहेत तिथे सर्व आवश्यक औषधे उपलब्ध ठेवावित. संसर्ग फैलणार नाही याची काळजी घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

लसीकरणाचा(vaccination) वेगही वाढविणे आवश्यक आहे, तसेच बाधितांचे सर्व्हेक्षण मोठ्या प्रमाणावर करण्याचे निर्देशही एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्र्यांशीही चर्चा करून संसर्गावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाला सतर्क करून योग्य व आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सांगितले.

Mumbai : लाडली बहन योजना बंद नहीं होगी : देवेंद्र फडणवीस

मुंबई : (Mumbai) महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis) ने सोमवार को जालना में कहा कि जब तक वे राज्य...

Explore our articles