spot_img

Mumbai : मुंबईसह राज्यातील पोलीस अधीक्षक, उपायुक्तांच्या अखेर बदल्या

Mumbai: Superintendent of Police, Deputy Commissioner of the state including Mumbai has finally transferred

चांगली कामगिरी असलेल्यांना मनासारख्या जागा
मुकुंद लांडगे
मुंबई : (Mumbai)
राजकारण्यांच्या हेवे-दाव्यात अडकलेल्या मुंबईसह राज्यभरातील तब्बल १०४ पोलीस अधीक्षक(Superintendents of Police), उपायुक्तांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला आहे. याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे यात चांगली कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या मनासारख्या ठिकाणी पोस्टिंग केली असून, यात अनेक अधिकाऱ्यांना मुंबईत आणण्यात आले आहे.

मुंबईत नियुक्त्या झालेल्या अधिकाऱ्यात पुण्याचे अधीक्षक अभिनव देशमुख, अनिल पारसकर, अहमदनगरचे मनोज पाटील, एम. रामकुमार, अमोघ गांवकर, गौरव सिंग, सोलापूर ग्रामीणच्या तेजस्वी सातपुते, प्रवीण मुंढे, दीक्षितकुमार गेडाम, मंगेश शिंदे, अजय कुमार बन्सल, मोहित कुमार गर्ग, पुरुषोत्तम कराड, अकबर पठाण आदींचा समावेश आहे. तर, ठाणे शहरात नियुक्ती झालेल्यात रुपाली अंबुरे, एस. एस. बुरसे, राजेंद्र दाभाडे, अमरसिंग जाधव, शिवराज पाटील, प्रशांत मोहिते-एसीबी (Thane) यांचा समावेश आहे.

मीरा-भाईंदर-वसई-विरार आयुक्तालयात बदली झालेले अविनाश अंबुरे, सुरेश मेंगडे, संदीप डोईफोडे, सुहास बावचे, तर नवी मुंबईत नियुक्त्या झालेले अधिकारी पंकज डहाणे, अमित काळे, संजयकुमार पाटील, योगेश चव्हाण आदींचा समावेश आहे.

दरम्यान, प्रसाद अक्कानारु, श्वेता खेडकर, विजयकांत सागर, प्रशांत वाघुंडे, विशाल गायकवाड, अजित बोराडे, दत्ता नलावडे, दत्तात्रय कांबळे, ज्योती क्षीरसागर या अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या असून, याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, पाच आयपीएस अधिकाऱ्यांना वरिष्ठ समय श्रेणीत बढती देण्यात आली आहे. आंचल दलाल(सांगली), अबिनाश कुमार(नांदेड), निलेश तांबे(मालेगाव), कुमार चिंता (गडचिरोली), यतिश देशमुख(गडचिरोली) याशिवाय नांदेडचे अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांची बदली करण्यात आली आहे.

पुण्यातील चांगली कामगिरी असलेले अधिकारी

पुण्यातल्या(Pune) पोलीस उपायुक्त दर्जाच्या बहुतांश अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात राज्यात पोलीस अधीक्षक, तसेच अन्य पदावर चांगले काम केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळेच त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना बदल्या मिळाल्या आहेत. ज्या अधिकाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल गेल्या दोन वर्षात तक्रारी होत्या किंवा माध्यमांमध्ये त्या संदर्भातल्या चर्चा झाल्या होत्या, अशा काही अधिकाऱ्यांना बदलीच्या रूपाने त्याची ‘बक्षिसी’ मिळाल्याचे अधिकाऱ्यांतून बोलले जात आहे.

Explore our articles