
Indiagroundreport वार्ताहर
मुंबई : (Mumbai) आजच्या दिवशी २०१६ साली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी जाहीर करून देशातील स्थिर अर्थकारणाची हत्या केली. सहा वर्षे सरली, तरी दुखवटा मात्र सरला नाही. याचपार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘नोटाबंदीला श्रद्धांजली’ वाहण्याचे राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील(Jayant Patil) यांनी ट्वीट करीत दिली आहे.
लोकांचे दरडोई उत्पन्न जे २०१६-१७ मध्ये ८.२ टक्के होते ते २०२०-२१ मध्ये -७.३ टक्के झाले आहे. नोटाबंदीमुळे सुमारे ३ कोटी लोकांनी आपली नोकरी गमावली. सध्याचा बेरोजगारीचा दर ७.७७ टक्के इतका वाढला आहे. महाराष्ट्रातील सुमारे ८० हजार सूक्ष्म, लघु आणि मध्यम व्यवसाय २०१६ पासून कायमचे बंद झाले आहेत, अशी धक्कादायक माहितीही पाटील यांनी ट्विटमध्ये(tweet) दिली आहे.
मध्यमवर्गीयांच्या(middle class) संसाराचा गाडा कसाबसा पुढे रेटला जातोय आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही नोटाबंदीला श्रद्धांजली वाहून आम्ही ‘अच्छे दिना’ची वाट पाहतो आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.


