Mumbai : सोशल मीडियास्टार रावडी भाटीचे अपघातात निधन

0
207
Mumbai

Indiagroundreport वार्ताहर
मुंबई
: (Mumbai) उत्कृष्ट संवाद आणि अभिनयाने सोशल मीडियावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या रावडी भाटी(Rawadi Bhati) ऊर्फ ​​रोहित भाटीचा सोमवारी पहाटे रस्ता अपघातात मृत्यू झाला.

बीटा-2 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चुहारपूर गावातील रस्त्याजवळून त्याची भरधाव कार अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. या अपघातात कारमधील अन्य दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच रोहितच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर(social media) त्याच्या अपघाती निधनाचा शोक व्यक्त केला. बुलंद शहरात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्याचे चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

बुलंद शहरातील सिकंदराबादचा रहिवासी असलेला रोहित भाटी सोशल मीडियावर रावडी भाटी या नावाने प्रसिद्ध होता. रावडी नोएडामध्ये(Noida) राहत होता. रविवारी रात्री तो मित्रांसह नोएडाहून घरी परतत होता. मंगळवारी पहाटे ३ वाजता रावडी भाटी त्याच्या दोन मित्रांसह स्विफ्ट कारमधून जात होता. त्याची कार अनियंत्रित होऊन चुहारपूर अंडरपासजवळ झाडावर आदळली.